December 21, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मंगळागौरीचा रंगणार खेळ.

गौरीची पहिली मंगळागौरीत येणार का विघ्न?

श्रावण महिना सुरु झाला की चाहूल लागते ती सणांची. विशेष म्हणजे श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. आणि याच मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. आपल्या गौरीची ही पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार पडणार आहे. नऊवारी साडी, सुंदर पारंपरिक दागिने असा शिर्केपाटील कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा थाट विशेष लक्ष वेधणार आहे. लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखिल आवर्जून मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे. 

एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना नवीन वळण म्हणून जयदीपच्या अटकेने मात्र आनंदाला गालबोट लागणार आहे. गौरीची मंगळागौरीची पूजा सुरु असतानाच शिर्केपाटलाच्या घरी जयदीपला अटक करण्यासाठी पोलीस दाखल होतात. आता मुख्यम्हणजे जयदीपचा नेमका गुन्हा काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता गौरीच्या पहिल्या मंगळागौरीच्या पुजेत आलेलं हे विघ्न कसं दूर होणार हे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी नाकी पाहा सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.