January 15, 2025

lollipop Entertainment

Lights Camera Action

स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गायत्री दातारची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने ६ वर्षांचा लीप घेतला आहे. लीपनंतर कथानकात बरेच बदल झाले आहेत. जयदीप गौरी एकमेकांपासून दुरावले असून या दोघांची लाडकी लेक म्हणजेच लक्ष्मी जयदीपसोबत वेगळ्या शहरात रहात आहे. जयदीप गौरीची पुन्हा भेट होणार का याची उत्सुकता नक्कीच आहे. मात्र मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. रुही कारखानीस असं नव्या पात्राचं नाव असून अभिनेत्री गायत्री दातार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

ही नवी भूमिका साकारण्यासाठी गायत्री खुपच उत्सुक आहे. खूप मोठ्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिलीच मालिका आहे. मालिकेतली माझी भूमिका आणि लूक खूपच वेगळा आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत मी एक रिऍलिटी शो केला होता. त्यामुळे गिरीजासोबत जुनी मैत्री आहे. त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतंच्या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होत असल्याची भावना गायत्रीने व्यक्त केली.

रुही कारखानीसच्या येण्याने मालिकेत नेमकं काय वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहसोबत.