
आहान पांडे आणि अनीत पड्डा जेव्हा पहिल्यांदा सैयाराच्या जगात पाऊल ठेवत
होते, तेव्हा प्रेक्षकांना कल्पनाही नव्हती की ते दशकातील सर्वात मोठ्या
प्रेमकथेतील सर्वात विद्युतमय ऑनस्क्रीन जोडी पाहणार आहेत. पण खरी जादू
काय होती? त्यांची केमिस्ट्री प्लॅन केलेली नव्हती—ती नैसर्गिकरित्या फुलली,
अगदी खरी मैत्री जशी फुलते तशी. आहान स्वतः म्हणतो, “जेव्हा दोन लोक
खरोखरच चांगले मित्र बनतात, तेव्हा ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्लॅन करण्याची
गरजच नसते… जे काही होतं, ते सहज आणि नैसर्गिकपणे होतं.”

अनीत त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढत म्हणते… “मी जेव्हा आहानला
पहिल्यांदा भेटले, तेव्हाच मला जाणवलं की या व्यक्तीसोबत मी खूप कम्फर्टेबल
राहणार आहे… त्याच्यात काहीतरी खूपच मनमोकळं होतं.” ती सांगते की जेव्हा
ती पहिल्यांदा मोहित सूरी आणि आहानला एकत्र भेटली, तेव्हा ती खूप नर्व्हस
होती. “मी थोडी गोंधळत होते, माझे विनोद चालत नव्हते, आणि तो बिचारा
तरीही हसत होता!!!” पण त्या भेटीने काहीतरी खास सुरू झालं. त्याने गिटार
वाजवला, आम्ही गाणी गायली, तो मला घरी सोडायला आला तेव्हा कारमध्ये
खूप गप्पा मारल्या… आणि तेव्हाच मला वाटलं की हा माणूस खूपच छान आहे,
त्याची एनर्जी खूप आवडली.” ती पुढे म्हणते, “शूटच्या आधीच्या काही महिन्यांत
आम्ही खूप चांगले मित्र झालो, खूप भेटलो, आमच्या शंकाकुशंका, भीती शेअर
केल्या… त्यामुळे सेटवर गेले तेव्हा मला खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटलं,
कारण आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे होतो.

More Stories
शेमारू मराठीबाणा वाहिनीवर ‘बॉलीवूड धमाका’