November 21, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

एका रात्रीत विनेश अपात्र? : स्वप्नांना १०० ग्रामचा फास

सध्या भारतात सगळ्यात जास्त चर्चेत असलेली खेळाडू म्हणजे विनेश फोगट ऑलिम्पिक च्या फायनल मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू.

तिची ऑलिम्पिक ची कामगिरी बघून विनेश भारताला २०२४ पॅरिस ऑलिम्पिक च पहिला गोल्ड मेडल मिळवून देणार या स्वप्नपूर्तीची सगळ्यांनाच खात्री होती, पण बुधवार दिनांक ७ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास आलेल्या एका बातमीने विनेशसह संपूर्ण भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला.

हि बातमी होती overweight ठरल्या कारणाने विनेशच्या ऑलिम्पिक मधील disqualification ची.

विनेश खेळत असलेल्या ५० किलो वजनी गटात तिच १०० ग्राम वजन जास्त आढळल्यामुळे तिला overweight म्हणून disqualify करण्यात आलं ज्यामुळे तिची फायनल मध्ये भारताला गोल्ड मिळवून देण्याची संधी हुकली. एवढंच नाही तर आता तिला कुठलही म्हणजेच सिल्व्हर मेडल देखील दिला जाणार नाही आशी चर्चा सुरू झाली. फायनल मॅच च्याआधी विनेशच वजन २ किलो ने वाढला होता. ते कमी करून ५० किलो गटात बसण्यासाठी तिने पूर्ण रात्रभर खूप प्रयत्न केले

पण नक्की एक रात्रीत असा काय घडलं? ऑलिम्पिक चे नियम काय म्हणतात? आता पुढे काय होणार? विनेशला मेडल मिळणार का? हे सगळं जाणून घेऊया.

ह्या वर्षी विनेश ऑलिम्पिकमध्ये ५० किलो फ्रीस्टाइल गटात सहभागी झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये जपानच्या युई सुसाकीला ३-२ ने हरवल. आपला दमदार खेळ दाखवत क्वार्टर फायनलमध्ये तिने युक्रेनच्या ओक्साना लिवाचला ७-५ ने हरवल तर कुबाच्या गुझमानला ५-० ने हरवत फायनलमधे झेप घेतली.

विनेशचा खेळ पाहून सगळ्यांनाच तिच्या कढून गोल्डची अपेक्षा होती.

पण बुधवारी बातमी आली की overweight ठरल्यामुळे विनेश ऑलिम्पिक मधुन अपात्र!!  ह्या बातमीने संपूर्ण भारताला मोठं धक्काच बसला. एक दिवस आधी गोल्डच्या आशेनं झोपी गेलेल्या भारतीयांची झोप ह्या बातमीने उडवली.

ऑलिम्पिकमध्ये कुस्ती चे सामने २ दिवस होतात. पहिल्या दिवशी राऊंड ऑफ १६, क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल असे ३ सामने होतात तर दुसऱ्या दिवशी रेपचेज राऊंड ब्राँझ मेडल आणि गोल्ड मेडलची मॅच पार पडते. या मॅचेस साठी खेळाडूंना आपलं वजन सहभागी झालेल्या वजनी गटात ठेवायचा असतं आणि विनेश ५०किलो गटात सहभागी झाल्यामुळे तिला तिच वजन ५०किलोच्या आत ठेवणं भाग होतं. मंगळवारी ६ ऑगस्टला झालेल्या मॅचेस मध्ये तिच वजन ५०किलोच्या आत होत, त्या दिवशी ती ३ मॅचेस खेळली आणि जिंकली सुद्धा. पण बुधवारी सकाळी तिचा वजन ५०किलो पेक्षा १००ग्राम जास्त भरला आणि विनेश ऑलिम्पिक फायनल साठी अपात्र असल्याचा जाहीर करण्यात आला.

सूत्रांच्या आधारे फायनलच्या आधी विनेशच वजन २ किलो ने वाढला होतं. विनेश रात्रभर झोपली नाही वजन कमी करण्यासाठी तिने रात्रभर running, cycling, दोरीवरच्या उड्या असं सगळं  केलं, एवढंच न्हवे तर तिने स्वतःचे केस कापले, शरीरातला रक्त देखील काढला; पण तिच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. फायनलच्या आधी वजन चेक करताना त्यात १०० ग्राम वजन जाता आढळला. या सगळ्यात Dehydration मुळे विनेशला रुगणालयात भरती करण्याची वेळ आली.

पण ऑलिम्पिकमधे खेळाडूंसाठी, त्यांच्या वाजनाबाबत नेमके काय  नियम आहेत?

  • ऑलिम्पिक दरम्यान सहभागी झालेल्या वजनी गटाच वजन मेन्टेन करणं खेळाडूंना महत्त्वाचं असतं
  • ऑलिंपिकच्या मॅच आधी सगळ्या खेळाडूंचा सकाळी वजन चेक केला जाता
  • यावेळी ऑलिम्पिक असोसिएशन ने जे कपडे फायनल केले आहेत ते आणि मॅचचा युनिफॉर्म घालणं बंधनकारक असतं
  • वजनी गटापेक्षा कही ग्राम वजन जास्त असलेला देखील चालत नाही.
  • त्यानंतर त्यांचा मेडिकल चेकअप होतं पण वजन जास्त असल्यास खेळाडूला तेव्हाच अपात्र ठरवला जाता

आता पुढे काय ??

विनेशला मेडल मिळणार का??

 तर विनेशने सिल्वर मेडलसाठी CAS कढे दाद मागीतली आहे ज्याचा निर्णय अजुन यायचाय.

पण वजन जास्त भरल्यामुळे विनेशला मेडल मिळण्याची शक्यता कमीच आहे कारण ऑलिंपिकच्या नियमानुसार खेळाडूच वजन जास्त असेल तर त्याला रिझल्टच्या लिस्ट मध्ये खालचा स्थान दिलं जातं जर मॅच मेडल ची असेल तर त्याच क्षणी disqualify केलं जातं.

विनेश मेडलसाठी असलेल्या मॅच मध्ये अपात्र ठरली, आता तिला अपत्रतेची कारवाही झाल्यावर ऑलिम्पिक विलेज देखील सोडावा लागेल.

या सगळ्यामुळे विनेश एक ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी गमावून बसली, पण तिच्या ऑलिम्पिकच्या दमदार आणि साहसी खेळाचा पूर्ण भारताला अभिमान आहे.

Author : Ketki Lembhe.