January 22, 2026

lollipop Entertainment

Lights Camera Action

पहिल्या आठवड्यात घरामध्ये असणार महिलांचे राज्य !

मुंबई २० सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सिझनला बरीच सरप्राईझेस असणार आहेत. या सिझनच्या पहिल्या आठवड्यात घरावर महिलांचा राज्य असणार आहे. काल पार पाडलेल्या ग्रँड प्रिमियरच्या भागामध्ये प्रत्येक महिला स्पर्धकला सांगण्यात आलं की, तुम्ही घरातील एका भागाच्या मालकीण असणार आहात आणि तुम्हाला एक सेवक दिला जाणार आहे. यामध्ये घरातील सगळी काम त्या सेवकाला पार पाडायची आहेत, ज्यामध्ये मालकिणीचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल.आता या महिला सदस्य कसं काम करू घेणार ? यामुळे घरामध्ये किती वादविवाद होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

किचनच्या मालकीण (सकाळची जबाबदारी) आहेत सुरेखा कुडची आणि त्यांचे सेवक आहेत आविष्कार दारव्हेकर आणि संतोष (दादुस) चौधरी. किचनची संध्याकाळची जबाबदारी (मालकीण) स्नेहा वाघ आणि जय दुधाणे, विशाल निकम असणार आहेत सेवक. डिशिंगची मालकीण तृप्ती देसाई आणि त्यांचे सेवक असणार आहेत उत्कर्ष शिंदे, अक्षय वाघमारे. लिव्हिंग रुम आणि डायनिंगची मालकीण आहे गायत्री दातार आणि सेवक आहेत जय दुधाणे. बेडरूमची मालकीण आहे मिरा जगन्नाथ आणि सेवक आहे आविष्कार. बाथरूमची मालकीण आहे मीनल शाह सेवक आहे विकास पाटील. GYM एरियाची मालकीण आहे सोनाली पाटील आणि संतोष (दादुस) चौधरी आहेत सेवक. गार्डन + स्वीमिंग पूल या एरियाच्या मालकीण आहेत शिवलीला पाटील आणि त्यांचे सेवक असणार आहेत विकास पाटील.


 
बघूया हे सेवक त्यांना दिलेलं कार्य कश्याप्रकारे पार पाडतील. बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.