November 14, 2025

lollipop Entertainment

Lights Camera Action

स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५ कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर कलाकारांचा ढिंचॅक अंदाज

कलाकारांच्या हटके पोशाखांनी वेधलं लक्ष

स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमाची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. धमाकेदार परफॉर्मन्सेस, कॉमेडीचा तडका आणि खुमासदार सूत्रसंचालनाने रंगलेला भव्यदिव्य सोहळा १२ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासोबतच यंदा रेड कार्पेटवरचा झगमगाटही लक्षवेधी ठरणार आहे. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारे कलाकारांचे पोशाख यंदाच्या दिवाळीचं खास आकर्षण ठरणार आहेत.

रेड कार्पेटवरच्या या झगमगाटात सर्वच कलाकारांचे लूक ढिंचॅक होते. लपंडाव मालिकेतील सरकार अर्थात रुपाली भोसले, कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेते यश-कावेरी म्हणजेच मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू, नशीबवान मालिकेतले रुद्रप्रताप-गिरिजा म्हणजेच आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक, हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत म्हणजेच समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर, येड लागलं प्रेमाचं मालिकेतील राया-मंजिरी म्हणजेच विशाल निकम आणि पूजा बिरारी, लग्नानंतर होईलच प्रेम, घरोघरी मातीच्या चुली, साधी माणसं, ठरलं तर मग, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि तू ही रे माझा मितवा मालिकेतल्या कलाकारांची रेड कार्पेटवरची एण्ट्री हटके ठरली.

तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाह परिवाराची ढिंचॅक दिवाळी १२ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.