December 3, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

संस्कृती बालगुडे करणार मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

८ वर्षांनंतर संस्कृती बालगुडेच छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणार आहे आपली आवडती अभिनेत्री संस्कृती बालगुडे. तब्बल ८ वर्षांनंतर संस्कृती धमाकेदार टेलिव्हिजन कमबॅकसाठी सुसज्ज झाली आहे. विशेष गोष्ट म्हणजे संस्कृती पहिल्यांदाच होस्टच्या रुपात या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृती बालगुडेला वेगवेगळ्या रुपात याआधी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण मी होणार सुपरस्टार मधला तिचा सुंदर आणि ग्लॅमरस अंदाज अनोखा रुपात पाहायला मिळणार आहे.

या पुर्णपणे अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना संस्कृती म्हणाली, स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या व्यासपीठवर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेण्ट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून थक व्हायला होतं. नृत्य ही माझी अगोदर पासून आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच याच नृत्याने झाली. त्यामुळे हा मंच नवी एनर्जी देतो. मी पहिल्यांदाच होस्टची मोठी जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय त्यांच्यासोबत थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी व सुंदर रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी झलक असणार आहे. या कार्यक्रमात माझा वेगळा आणि सुंदर लूकदेखिल पाहायला मिळेल. स्टायलिस्ट नेहा चौधरीने माझा हा सुंदर लूक डिझाईन केला आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन कमबॅकसाठी खुपच उत्सुक आहे अशी भावना संस्कृती बालगुडेने व्यक्त केली.’

तेव्हा आवर्जून पाहायला विसरु नका ‘मी होणार सुपरस्टार… जल्लोष डान्सचा’ २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या आवडत्या स्टार प्रवाहवर.