September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

अभिनेता अंकुश चौधरी सुपरजजच्या भूमिकेत तर संस्कृती बालगुडे करणार सूत्रसंचालन

स्टार प्रवाहवर येत्या २१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आपल्या आवडत्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपला त्यांचे दमदार टॅलेंट या मंचावर दाखवतील. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे व सुंदर प्रकार या मंचावर पाहायला मिळतील. मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पडणार आहे आपला आवडता अभिनेता अंकुश चौधरी. तर संस्कृती बालगुडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालना ची जबाबदारी पारपाडणार आहे. हिंदी रिऍलिटी शो गाजवणारे नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे आणि कृती महेश या शो चे कॅप्टन असणार आहेत.

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश चौधरी म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना खूप आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय त्याची मला उचुक्ता लागली आहे. डान्स हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे.या रियालिटी शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी येथे बसून प्रत्यक्ष घेईन आणि माझी जबाबदरी पर पाडीन . मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा आणि उमीद घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मला आनंद होईल . त्यामुळे मी या शोसाठी खूप उत्सुक आहे.

या पुर्णपणे अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना संस्कृती म्हणाली, स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या व्यासपीठवर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेण्ट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून थक व्हायला होतं. नृत्य ही माझी अगोदर पासून आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच याच नृत्याने झाली. त्यामुळे हा मंच नवी एनर्जी देतो. मी पहिल्यांदाच होस्टची मोठी जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय त्यांच्यासोबत थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी व सुंदर रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी झलक असणार आहे. या कार्यक्रमात माझा वेगळा आणि सुंदर लूकदेखिल पाहायला मिळेल. स्टायलिस्ट नेहा चौधरीने माझा हा सुंदर लूक डिझाईन केला आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन कमबॅकसाठी खुपच उत्सुक आहे अशी भावना संस्कृती बालगुडेने व्यक्त केली.’

तेव्हा आवर्जून पाहायला विसरु नका ‘मी होणार सुपरस्टार… जल्लोष डान्सचा’ २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या आवडत्या स्टार प्रवाहवर.