September 8, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नविन एन्ट्री.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध देशमुखच्या भावाची होणार एन्ट्री सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे साकारणार अविनाश देशमुख.

स्टार प्रवाहवरील आपली आवडती ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा लहान भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री होणार आहे. मालिकेत आजवर या पात्राविषयी आपण खुपदा ऐकत आलोय. पण आता हे पात्र अविनाश देशमुखांच्या घरात दाखल होणार आहे. सुप्रसिद्ध आणि आपला आवडता अभिनेता शंतनू मोघे अविनाश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शंतनू मोघे म्हणाला, ‘आई कुठे काय करते मालिकेचा मी मोठा फ्यान आहे. माझ्या घरातल्या सर्वांचीच ही खूप आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत मला काम करायला मिळणं हे माझ प्रचंड मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. मालिकेची टीम अतिशय भन्नाट आणि कमालीची आहे. या टीममध्ये मी जरी नविन असलो तरी मला तसं कुणी जाणवू देखील दिलं नाही. खूप प्रेमाने माझं स्वागत केले. आई कुठे काय करते या मालिकेची ही स्वप्नवत टीम आहे. सुजाण कलाकार, उत्कृष्ट संवादलेखन आणि तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आणि प्रसिद्धीला आली आहे. अविनाश या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झाला तर १५ वर्षांपूर्वी त्याने देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. वैचारिक मतभेदांमुळेच अविनाशने हा निर्णय घेतला असावा. मात्र आता हसतं खेळतं कुटुंब दुभंगणार हे कळल्यावर त्याची पावलं पुन्हा एकदा कुटुंबाकडे वळली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने एका छान व सुंदर कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळाल्याची भावना शंतनू मोघेने व्यक्त केली.’

आई कुठे काय करते मालिका सध्या भावनिक वळणावर आली आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या नात्याची वीण उसवल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची खूप मोठी गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का? त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण घेणार आहे हे पुढील भागांमधून स्पष्ट होईल. त्यासाठी आवर्जून पाहायला विसरु नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त आपल्या आवडत्या स्टार प्रवाहवर वाहिनी वर.