December 5, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

इटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’

सध्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना, ‘येरे येरे पावसा’ हा आपला आवडता आगामी मराठी चित्रपटही विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाची निवड झाली आहे. टोरंटो, कॅनडा आणि टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशाच्या आणि पुरस्कारांच्या सरी झेलणारा हा चित्रपट आता जीफोनी हा प्रसिद्ध महोत्सव गाजवायला सज्ज झाला आहे. एलिमेंट ६ या मुख्य विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ६ ते ९ या वयोगटातील ८०० मुलं या महोत्सवाचे परिक्षका चे काम करणार आहेत. इटलीमध्ये “येरे येरे पावसा” या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच संपन्न झाले. त्यानंतर झूम मिटिंगद्वारे दिग्दर्शक शफक खान यांच्यासोबत प्रश्न उत्तरांचे सेशन पर पडले.

प्रत्येकाला पावसाची कमालीची उचुक्ता असते. इतर कोणत्याही ऋतूपेक्षा आपल्याला पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रचंड उत्सुकता वाटायला लावणारी असते.. एकंदर काय तर, प्रत्येकाची पहिला पाऊस अनुभवण्याची वेगळी त-हा आणि पडत असते. पावसाचा असाच काहीशा वेगळा रंगढंग दाखवणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक शफक खान यांनी  केले आहे. ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे ही त्या आवर्जून म्हणाल्या.

या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यानी केली आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते म्हणून पाहायला मिळाले. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी उत्तम रीतीने सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यानी केले आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी सुंदर पडतीने लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी सुंदर आणि मनाला भाळणारे असे संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना दिला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यानी दिले आहे.