September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

चित्र मराठी’ या नव्या प्लॅटफॉर्मची ओटीटीवर दमदार एंट्री

मंदार काणे आणि समीर पौलस्ते निर्मित ‘चित्र मराठी’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांच्या भेटीस लवकरच

आताच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. कोरोनामुळे चित्रपटसृष्टीला लागलेल्या ब्रेकमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मने रसिकांचे मन जिंकले आहे. मनोरंजन दुनियेतील ओटीटी हा एक प्रमुख घटक बनत चला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वेगळ्या दृष्टिकोनातून आणि आशयघन आणि नवीन विषय घेऊन हे ओटीटी प्लॅटफॉर्म कायमच तत्पर असतात. कलाकारांना घेऊन प्रेक्षकांच्या सेवेस तत्पर अशा चित्र मराठी.. मनोरंजन घराघरांत, मनोरंजन मनामनात ने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार आणि भन्नाट एंट्री केली आहे. आता नव्या रूपात भेटीला आलेला हा ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अध्यात्म असा बराच नाविन्यपूर्ण कंटेन्ट या प्लॅटफॉर्मवर हाताळला जाणार आहे. दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुरुवातीला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दहा वेबसिरीज येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


‘मंदार काणे एंटरटेनमेंट’ आणि ‘स्पार्कल्स९ मीडिया’ निर्मित चित्र मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली असून नुकतेच याचे नाव आणि लोगो अनावरण सोहळा दिमाखात पार पडला आहे. नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संकल्पनेला आणि कलाकारांना उत्तेजित करण्यासाठी या सोहळ्याला दिग्दर्शक राज दत्त आणि अभिनेते जयंत सावरकर यांनी उपस्थिती दर्शवून चित्र मराठी प्लॅटफॉर्मचे संस्थापक मंदार काणे आणि सह संस्थापक समीर पौलस्ते यांच्यासह ‘चित्र मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आणि हा सोहळा पर पडला.


या चित्र मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख, संस्थापक मंदार काणे आवर्जून म्हणाले, ‘लॉकडाऊनच्या काळात चित्रपटसृष्टी पूर्णतः ठप्प झाली त्यामुळे नवकलाकारांना उभे राहण्याची संधी कुठेतरी धूसर झाली होती. याच नवकलाकार आणि प्रतिभावान कलाकारांना उभारी देण्यासाठी हा नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही आलो आहोत. याशिवाय खेड्यापाड्यातील प्रतिभावान मुलांना पुढे आणण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म कधीही कमी पडणार नाही असेही ते म्हणाले. एका वेगळ्या उंचीवर हा ओटीटी प्लॅटफॉर्म पोहोचवणे हा एकच उद्द्येश्य मनाशी बाळगून हा टप्पा पार करायचा आहे. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आणि आशयघन विषय देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत आणि करत राहू. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येऊ. 
तसेच चित्र मराठी चे  सह संस्थपाक समीर पौलस्ते एकूणच या प्लॅटफॉर्म बद्दल बोलताना असे सांगतात की, ‘लोककला प्रोत्साहन देणे आणि दिग्गज व नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या प्लॅटफॉर्मचा प्रमुख मानस आहे. शिवाय आपल्या मराठी चित्रपटसृष्टी डिजिटल व जागतिक पातळीवर पोहोचायला हवी हा एकमेव उद्देश्य घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालो आहोत आणि त्यासठी खूप उत्चूक हि आहे. नवनवीन आशयघन विषय तुमच्या भेटीला आणू आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी मी आशा करतो’ व मला खात्री ही आहे.