सध्या मुंबईकरांचा सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते विश्र्विजेता टीम इंडियाच्या victory parade ने आणि ह्या victory parade च वैशिष्ट्य म्हणजे मुंबई ची एक सांस्कृतिक ओळख, म्हणजेच आपली ओपन डेक बस!
पण २०२३ला ओपन डेक बस ने मुंबईकरांचा निरोप घेतला.
१५ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईच्या ब्रिहानमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रांसपोर्ट (BEST) संस्थेची शेवटची डिझेल चालित डबल डेकर बस रस्त्यावर उतरली या लाल परीने दीर्घकाळापासून दक्षिण मुंबईशी एक अद्वितीय नातं जोडलं होतं. हि बस अनेकांच्या आठवणी, बॉलीवूड गाणी, कला, आणि मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याची साक्षीदार झाली आणि म्हणून हिला मुंबईच एक सांस्कृतिक चिन्ह मानलं जाऊ लागला.
पण ह्या डबल डेकर बसचा भारतातील इतिहास काहीसा वादग्रस्त आहे. काहींचं म्हणणं आहे की त्रिवेंद्रमचे राजा चिथिरा तिरुनाल बलराम वर्मा यांनी Englishman ई. जी. सॉल्टर यांना त्यांची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी नेमलं होतं, ज्यामुळे डबल डेकर बसची सुरुवात झाली. तरीही, बहुसंख्य लोक मानतात की १९३७ साली बॉम्बे प्रेसीडेंसीत लंडनच्या डबल डेकर बसच्या प्रेरणेने मुंबईत डबल डेकर बसची सुरुवात झाली.
१९६० च्या दशकात कोलाबा कॉजवे, रिगल सिनेमा, फ्लोरा फाउंटन, मरीन ड्राईव्ह, आणि गिरगाव चौपाटी अशा मुंबईच्या प्रसिद्ध मार्गांवर जवळपास ९०० डबल डेकर बस चालत होत्या. ह्या मार्गांनी दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचा प्रवास मुंबईकरांसाठी सोपा केला. डबल डेकर बसने मुंबईकरांच्या वाहतुकीत एक महत्त्वाची भूमिका बजावली .
परंतु, १९९० च्या दशकाच्या operational costs, logistical challenges, and fuel inefficiency अशा कारणांनी ह्या बसची संख्या कमी होत गेली. आणि हळू हळू २०२३ मध्ये ह्या बसने मुंबईकरांचा निरोप घेतला. आता, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असे स्विच EiV22 नावाचे बॅटरी चालित ई-बस सुरु करण्यात आले आहेत. ह्या बसमध्ये जवळपास ९० प्रवासी बसू शकतात, जे पूर्वीच्या बसच्या दुप्पट आहे. मुंबईत अशा ९०० बस आणण्याची योजना असून, BEST ने पर्यटनासाठी दोन ओपन-डेक बस आणण्याचेही जाहीर केले आहे.
स्विच EiV22 ची अंमलबजावणी योग्य निर्णय असला तरीही, अनेक मुंबईकरांसाठी जुन्या बसची आठवण खास असेल. जुन्या बसच्या उघड्या खिडक्यांतून येणाऱ्या वाऱ्याचा अनुभव नवीन एसी बसमध्ये नाही मिळणार अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिल्या.
BEST ने एका ऐतिहासिक बसला जतन करण्याचा निर्णय घेतला आहे, जी “अनिक” बस डेपोच्या संग्रहालयात ठेवण्यात येईल. ह्या बसच्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाचा एक तुकडा कायमस्वरूपी जतन होणार आहे.
Author : Ketki Lembhe.
More Stories
“भारतीय ऑलिंपिक इतिहासाचा सुवर्ण प्रवास: २०२४ ची कामगिरी”
“रक्षाबंधनाच्या अनोख्या कथाः परंपरा आणि आधुनिकतेचा संगम”
श्री विष्णुंचे सर्वात मोठे भक्तच झाले त्यांचे शत्रु..!