December 5, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

बिग बॉस मराठी सिझन तिसरा,सगळ्यात मोठं सरप्राईझ – “Temptation Room”

मुंबई २४ सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल मिळालं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ. बिग बॉस मराठीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉस यांनी सदस्यांना दाखविली Temptation Room ची पहिली झलक. या Temptation Room मध्ये असणार आहेत सदस्यांसाठी बरीच सरप्राईझेस आणि Temptations. या रूममध्ये असणार आहे फोनबूथ ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील. तसेच असणार आहेत खाण्याचे विविध पदार्थ जे बिग बॉसच्या घरात सदस्यांसाठी उपलब्ध नसतात. बायोस्कोप असणार आहे, ज्यामधून सदस्य घराच्या आत डोकावू शकतील. पावर कार्ड, बुक ऑफ Temptation  आता या दोघांमध्ये काय गुपित दडलेलं आहे, त्यांची काय ताकद आहे ते सदस्यांना त्या रूममध्ये गेल्यावरच कळणार आहे.

तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.