December 8, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

“भारतीय ऑलिंपिक इतिहासाचा सुवर्ण प्रवास: २०२४ ची कामगिरी”

नुकताच पार पडलेल्या पॅरिस Olympics २०२४ मध्ये संपूर्ण भारताचा लक्ष वेधलं ते हरियाणाच्या मनू भाकर ने. या २२ वर्षाच्या मनू ने women’s 10 meter air pistol मध्ये कांस पदक म्हणजेच bronze medal जिंकत भरातला २०२४ छा पहिला ऑलिम्पिक मेडल मिळून दिला आणि ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला शूटर ठरली. एवढंच नव्हे तर mixed 10 meter air pistol team event मध्ये आणखी एक कांस्यपदक जिंकत, एका ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.”

नुकतच पार पडलेल्या या Olympics मध्ये मनू सारखेच अनेक खेळाडू होते जे आपल्या भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. पॅरिसमधील 2024 ऑलिंपिक भारतासाठी एक रोमांचक पर्व ठरला कारण भारताने आपली आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी म्हणजेच एकुण ११७ खेळाडू पाठवले होते. ज्याचा उद्देश आतापर्यंतचा सर्वात चांगला पदकसंख्या गाठण्याचा होता. 2024 च्या ऑलिंपिककडे जगाचे लक्ष लागले असताना, भारताच्या ऑलिंपिक इतिहासावर आणि यंदाच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

भारताचा ऑलिंपिक प्रवास 1900 मध्ये सुरू झाला, जेव्हा नॉर्मन प्रिचार्डने ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली.

1928 मध्ये भारतीय फील्ड हॉकी संघाने पहिलं सुवर्णपदक जिंकून देशाला ऑलिंपिक नकाशावर आणले, आणि 1956 पर्यंत सलग सहा सुवर्णपदके जिंकली. स्वतंत्र भारतात 1952 मध्ये के. डी. जाधव यांनी कुस्तीत पहिलं वैयक्तिक ब्राँझ पदक मिळवलं

2000 साली सिडनी ऑलिंपिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकून ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.


2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिक मधे अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले.

लंडन 2012 मध्ये भारताने सर्वाधिक सहा पदके जिंकली. टोकियो 2020 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.,

भारताने २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये सहा पदकं जिंकली, ज्यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश होता.

मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारतासाठी पहिलं पदक मिळवलं आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला शूटर ठरली.

तिने सरबजोत सिंगसोबत mixed १० मीटर एअर पिस्तूल टीम स्पर्धेत कांस्य पदक जिंकले, ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत आणखी एक कांस्य पदक जिंकले.

पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठी स्पेनचा पराभव करून कांस्य पदक जिंकले.

नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर, तो भारताचा पाचवा वैयक्तिक द्विस्तरीय पदक विजेता ठरला.

अमन सेहरावतने फ्रीस्टाइल सत्तावन किलोग्राम कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकल आणि, २१ वर्षांच्या वयात ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला.

या वरून हे लक्षात येतं की भारताची ऑलिंपिक कथा ही निर्धार आणि चिकाटीची आहे. 2024 ऑलिंपिक भारतीय खेळाडूंच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक ठरल आणि त्यांच्या या मेहनतीवर संपूर्ण भारताला अभिमान आहे.

Author : Ketki Lembhe