स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोच्या सुपर जजची कोण पार पाडणार जबाबदारी ?
सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर धडाकेबाज आणि दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये आपला आवडता अंकुश चौधरी सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं सुपर टॅलेण्ट या डान्सच्या मोठ्या मंचावर अवतरणार आहे आणि ते पाहण्याची सर्वजन वाट पाहत आहेत . त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची सर्वाना उत्सुकता नक्कीच असेल. नृत्याचे वेगवेगळे सुंदर प्रकार तितक्याच हटके पद्धतीने मी होणार सुपस्टारच्या या मंचावर सादर होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अटीतटीची आणि जोमाची आहे. या स्पर्धकांमधून सर्वांचा आवडता सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे.
या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश चौधरी म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे आणि उचुक्ता ही लागली आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची आवडती आणि नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पडणार आहे. डान्स हा माझ्या खूप जास्त आवडीचा विषय आहे. या रियालिटी शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी येथे बसून प्रत्यक्ष घेईन आणि माझी जबाबदरी पर पाडीन . मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा आणि उमीद घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मला आनंद होईल . त्यामुळे मी या शोसाठी खूप उत्सुक आहे. तेव्हा आवर्जून पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या आवडत्या स्टार प्रवाहवर.’
More Stories
“भारतीय ऑलिंपिक इतिहासाचा सुवर्ण प्रवास: २०२४ ची कामगिरी”
“रक्षाबंधनाच्या अनोख्या कथाः परंपरा आणि आधुनिकतेचा संगम”
डबल डेकर मुंबईतून झाली आहे का लुप्त??