September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

साजिरी-शौनकला आशीर्वाद देण्यासाठी या कलाकारांची खास हजेरी

गेल्या अनेक दिवसांपासून साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता होती. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक विवाहबंधनात अडकणार आहे. साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतले कलाकार खास हजेरी लावणार आहे. यासोबतच मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे जज सचिन पिळगांवकर आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांची देखिल या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती असणार आहे. स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच लवकरच भेटीला येणाऱ्या झिम्मा सिनेमाच्या टीमनेही खास हजेरी लावत साजिरी आणि शौनकला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. २१ नोव्हेंबरला २ तासाच्या विशेष भागामध्ये मुलगी झाली हो मालिकेतला हा शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना पहाता येईल.

मालिकेतल्या या लग्नसोहळ्यासाठी साजिरी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर खूपच उत्सुक आहे. लहानपणापासून ज्याचं स्वप्न पाहिलं त्या शौनकशी विवाह होत असल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. या विवाहसोहळ्यासाठी साजिरीचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नातला लूक बऱ्याच लूक टेस्ट घेतल्यानंतर फायनल करण्यात आला आहे. नववधूच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर माझं खरंच लग्न होतंय असं वाटत होतं. त्यामुळे मी आणि मुलगी झाली हो मालिकेची संपूर्ण टीम या खास विवाहसोहळ्यासाठी उत्सुक आहोत. रविवार २१ नोव्हेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता साजिरी-शौनकचा विवाहसोहळा प्रेक्षकांना पहायला मिळेल. तेव्हा साजिरी आणि शौनकच्या लग्नाला नक्की यायचं हं!