September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अश्यातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे दुर्गा आत्याची भूमिका साकरणार असून बऱ्याच वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत.

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभा ताई म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही माझी सर्वात आवडती मालिका आहे मी दररोज आवर्जून पहाते. या मालिकेतील प्रत्येक पात्र माझ्या आवडीचं आहे. मला जेव्हा या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली तेव्हा क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला. या मालिकेत मी दुर्गा आत्याची भूमिका साकारणार आहे. वरवर पहाता कठोर वाटणारी दुर्गा आत्या मनाने खुपच हळवी आहे. तिच्या येण्याने कथानकात नेमका कोणता ट्विस्ट येणार? कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.