कार्तिकने नाकारला स्वत:च्या बाळाला त्याचं नाव देण्याचा अधिकार
स्टार प्रवाहवरील आपल्या आवडत्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपाने दोन सुंदर जुळ्या मुलींना जन्म दिलाय खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. आता मालिकेमध्ये जन्मानंतर दीपाचं एक बाळ तिच्यापासून दूर झालंय असे दाखवणार आहेत. तर दुसऱ्या बाळाचं पितृत्वच तिच्या नवऱ्याने म्हणजेच कार्तिक इनामदारने नाकारलं आहे. त्यामुळे दीपाने आता माझे बाळ वडिलांच्या नावाची भीक मागणार नाही असं ठमकावून सांगत एकटीने मुलीला मोठी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपा-कार्तिकच्या नात्यातला कटूपणा मुलींच्या जन्मानंतर तरी संपेल असं वाटत होतं. कार्तीच्या आईने म्हणजे सौंदर्याने स्वतः पुढाकार घेत या दोघांमधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर दीपाच एक बाळ आपल्या घरात आणून कार्तिकचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती जराही बदलण्याचं नाव घेत नाहीय. त्यामुळे दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचं भवितव्य नेमकंपुढे काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे. त्यासाठी नाकी पहा रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
More Stories
“भारतीय ऑलिंपिक इतिहासाचा सुवर्ण प्रवास: २०२४ ची कामगिरी”
“रक्षाबंधनाच्या अनोख्या कथाः परंपरा आणि आधुनिकतेचा संगम”
डबल डेकर मुंबईतून झाली आहे का लुप्त??