September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत येणार सहा वर्षांचा लीप

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेचं कथानक ६ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या नात्यात नवं वळण येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जयदीप-गौरीला कन्यारत्न झालं. शिर्केपाटील कुटुंबात चिमुकलीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण होतं. मात्र आपल्या लेकीला शालिनीपासून धोका आहे ही शंका जयदीपला सतावत होती. यामुळेच आपल्या लेकीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा जयदीपने निर्णय घेतला आहे. जयदीप आपल्या लेकीसोबत नेमका कुठे आहे याची कल्पना कुणालाच नाही. शालिनीने तर जयदीपचा मृत्यू झाल्याचं जाहिर केलं आहे. गौरीला मात्र जयदीप आणि लक्ष्मी सुरक्षित असल्याचा ठाम विश्वास आहे.

लीपनंतर चिमुकली लक्ष्मी आता मोठी होणार आहे. जयदीप-गौरीच्या लाडक्या लेकीची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे बालकलाकार साईशा साळवी. साईशा मुळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. साईशाने अनेक जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाहच्याच पिंकीचा विजय असो मालिकेतील तिने साकारलेली ओवी सर्वांच्याच आवडीची आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील लक्ष्मी साकरण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. या नव्या टीमसोबत तिची छान गट्टी जमली आहे. साईशा म्हणजेच लक्ष्मी सेटवर सर्वांचीच लाडकी आहे.

तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील लक्ष्मीसोबतचा हा नवा प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.